मंगळवेढा : तहसील कार्यालय मंगळवेढाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिराला आंधळगाव येथे सुद्धा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आजच्या तालुक्यातील दुसऱ्या शिबिराचे उदघाटन पंचायत समिती सभापती दीपाली ताड, उपसभापती अर्जुन मल्लाळे, तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य व इतर पंचायत समिती सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, करुणा क्षीरसागर, उपस्थित होते. तसेच पंचायत समिती सदस्य विनायक यादव, जयश्री कवचाळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार मदन जाधव यांनी केले, तर आभार मंडळ अधिकारी विद्या शिंदे यांनी मांडले.
शिबिराला तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ, तसेच पंचायत समिती, वनविभाग, आरोग्य विभाग, भूमी अभिलेख विभाग, पशू संवर्धन विभाग व महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आंधळगाव येथील जिल्हा परिषद शाळा येथे हे शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये महसूल विभाग व इतर विभागाचे असे एकूण 25 स्टॉल उभारण्यात आले होते.
तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी एकाच छताखाली महसूल विषयक सेवा देताना दिसून आले तर तहसील कार्यालयातील सर्व शाखांमधील अधिकारी व कर्मचारी यांनी सुद्धा जनतेला तात्काळ सेवा उपलब्ध करून दिल्या.
मंगळवेढा तालुक्यात एकूण 6 शिबीर राबविण्यात येणार असून आज आंधळगाव व मारापूर मंडळाच्या वतीने या शिबिराच3 आयोजन करण्यात आले.

आजच्या शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत महसूल विषयक व इतर विभागांच्या सेवांचा लाभ घेतला.
आजच्या शिबिरामध्ये महसूल विभागाच्या वतीने सर्वात जास्त म्हणजे 1994 लाभार्थ्यांना लाभ दिला, त्यामध्ये प्रामुख्याने, अभियानांतर्गत आजरोजी निकाली काढण्यात आलेल्या फेरफारांची संख्या – 412, अभियानांतर्गत 7/12 मधील दुरुस्ती संदर्भात स्वीकारण्यात आलेल्या अर्जांची संख्या – 11, अभियानांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या डिजिटल 7/12 उपलब्ध करून दिलेली संख्या – 621, अभियानांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या एकूण 8 अ उताऱ्यांची संख्या – 621 अभियानांतर्गत वितरित करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची संख्या – 611, अभियानांतर्गत एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत निकाली काढण्यात आलेल्या अर्जांची संख्या – 06, अभियानांतर्गत भूसंपादन प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या – 2, अभियानांतर्गत अकृषक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्यात आलेल्या एकूण प्रकरणांची संख्या -2, तसेच आतापर्यंत एकूण 195 घरकुल लाभार्थ्यांना 610 ब्रास वाळूचे मोफत वाटप करण्यात आले.
त्याचबरोबर संजय गांधी योजनेच्या वतीने 100, पुरवठा विभागाच्या वतीने 75, अभिलेख शाखेच्या वतीने दोन्ही मंडळातील 11 लाभार्थ्यांना शेतकुंडली वाटप, 6 लाभार्थ्यांना जन्म मृत्यू प्रमाणपत्र वाटप असे महसूल विभागाच्या वतीने आज एकूण 1994 नागरिकांना विविध सेवांचा लाभ देण्यात आला.

त्याचबरोबर पंचायत समिती -12, कृषी विभागाच्या -39, वन विभाग -13, आरोग्य विभाग – 121, महिला व बाल विकास विभाग -10, पशुसंवर्धन विभाग -30, भूमी अभिलेख विभाग -20, उमेद अभियान – 40, महा ई सेवा केंद्र – 85 असे आजच्या शिबिरात एकूण 2362 लाभार्थ्यांना एकाच दिवशी लाभ देण्यात आला.
यानंतर दिनांक 10 एप्रिल रोजी पाटखळ, 17 एप्रिल रोजी मरवडे, 8 मे रोजी भोसे व 15 मे रोजी नगर परिषद हद्दीत होणाऱ्या शिबिरांना सुद्धा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध महसूल विषयक व इतर विभागांच्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.

आजचे शिबिर यशस्वी होण्यासाठी नायब तहसीलदार शीतल कन्हेरे, निवासी नायब तहसीलदार शिरीष शहापुरे, निवडणूक नायब तहसीलदार जयश्री स्वामी, मंडळ अधिकारी विद्या शिंदे, वैशाली जमदाडे व आंधळगाव आणि मारापूर मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, स्वस्त धान्य दुकानदार, पोलीस पाटील, ग्रामपंचायत अधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले. या शिबिराला तालुक्यातील इतर सर्व मंडळ अधिकारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी आवर्जून उपस्थित होते.

क्षणचित्रे –
1) मरीआईवाले समाजातील उपेक्षित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने 27 नागरिकांना रेशनकार्ड, संजय गांधी योजनांचा लाभ देण्यात आला.
2) मरीआईवाले समाजातील नागरिकांनी त्यांच्या पारंपरिक पोशाख परिधान करून वाद्यांच्या गजरात शिबीर ठिकाणी प्रवेश करत उपस्थितांचे लक्ष वेधले.
3) जिल्हा परिषद शाळा आंधळगाव येथील इयत्ता 6 वी व 7 वी च्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाद्वारे पाहुण्यांचे स्वागत करून त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला.

4) नंदेश्वर येथील साळुबाई मनोहर डांगे या निराधार महिलेला एकाच दिवसात संजय गांधी योजनेचा लाभ देण्यात आला
5) मारापूर येथील धनाजी यादव व मारुती इंगळे यांच्यातील शेतस्त्यावरून असणारा 4 वर्षांपासूनचा वाद एका दिवसात मिटवून आपसी सामंजस्याने त्यांना रस्ता देण्यात आला.
*

