धामणगाव बढे : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर टप्पा एक अंतर्गत मौजे धामणगांव बढे, राजस्व मंडळ, धामणगांव बढे ता. मोताळा येथे आज दिनांक 14 मार्च रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सदर शिबिरामध्ये
1. अभियानातंर्गत निकाली काढण्यात आलेल्या फेरफारांची संख्या – 12
2. अभियानातंर्गत 7/12 मधील दुरुस्ती संदर्भात स्वीकारण्यात आलेल्या अर्जांची संख्या – 13
3. अभियानातंर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या डिजिटल 7/12 ची संख्या- 86
4. अभियानातंर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या 8 अ उताऱ्याची संख्या – 86
5. अभियानातंर्गत वितरित करण्यात आलेल्या सर्व प्रमाणपत्रांची संख्या -333
अ. पूरवठा वीभाग 177
ब.अधिवास प्रमाणपञ 54
उत्पन्न दाखला 30
जात प्रमाणपञ 04
क.भूमी अभीलेख 10
ड. आरोग्य विभाग 33
इ. कृषी वीभाग 07
फ. संजय गांधी विभाग 18
6. पशुपालकांचे आधार
Updation-36

7 महाराजस्व समाधान शिबिराचे औचित्य साधून करणेत आलेले पशु लसीकरण 2830
* अभियानातंर्गत एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत (Single Window Clearance) निकाली काढण्यात आलेल्या एकूण अर्जांची संख्या -24
8. अभियानातंर्गत भूसंपादन प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गांव दफ्तर अद्ययावत करण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या – 0
9. अभियानातंर्गत अकृषक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गांव दफ्तर अद्ययावत करण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या- 0

आज आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
तहसीलदार सरिता पाटील-खटाळयांनी या शिबिराचे नेटके नियोजन केले. मंडळातील ग्रामस्थांनी या शिबिराच्या आयोजना बद्दल समाधान व्यक्त केले.
महसूल वार्ता वृत्तसेवा बुलडाणा

