Author: Team Mahsulvarta

मंगळवेढा : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत असून मंगळवेढा तालुक्यात दिनांक 7 मार्च पासून या अभियानाचा शुभारंभ होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांचा लाभ जनतेला एकाच छताखाली मिळावा व या निमित्ताने महसूल यंत्रणा प्रत्येक गावापर्यंत पोहचावी या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत आहे. मंगळवेढा तालुक्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर जिल्हाधिकारी गणेश निराळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, प्रांताधिकारी बी.आर.माळी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 7 मार्च रोजी मंगळवेढा व बोराळे मंडळासाठी जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा याठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत…

Read More